भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधान मुल्यांची पायमल्ली भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांच्या जादु-टोण्याने भिवंडीत संतापाची लाट
भिवंडी दि.२५ (महेंद्र सोनावणे)
भ्रष्टाचाराची बजबजपुरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात काल भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या आयुक्तांचा जादुटोणा प्रताप ‘याची देही याची डोळा’ पाहिल्याने कर्मचाऱ्यांनी आयुक्त विरोधात संताप व्यक्त केला.
आयुक्तांचा जादुटोणा प्रताप पाहाण्यासाठी शहरातील पत्रकार व नागरिकांनी गर्दी करीत आयुक्तांच्या जादूटोणा प्रतापाविरोधात महाराष्ट्र जादुटोणा आणि अघोरी प्रथा विरोधी कायदा २०१३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भिवंडीतील नागरीकांची आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य हे सुत्रांच्या माहिती नुसार दहा बारा दिवसांसाठी परदेश दौऱ्यावर जात असतांना पालिका प्रशासनाच्या मुख्य कार्यालयातील आयुक्तांच्या दालनाच्या प्रवेशद्वारावर हनुमान देवतेची प्रतिमा लावून कार्यालयीन प्रवेशद्वाराला टाळा व सिल लावले तसेच दालनाच्या लगत लावण्यात आलेल्या लोखंडी गेटला मंत्रोच्चार करीत मातीचे मडके अडकण्यात आले.सदरचा जादु टोणा प्रकार पालिका कर्मचाऱ्यांचा समोर होत होता.
जादूटोणा आणि अंधश्रद्धा विरोधी कायद्यांतर्गत शिक्षा कायद्याच्या तरतुदींवर अवलंबून असते आणि ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये थोडीफार वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, महाराष्ट्र जादूटोणा आणि अघोरी प्रथा विरोधी कायदा, 2013 अंतर्गत शिक्षा खालीलप्रमाणे आहे:
शिक्षेच्या तरतुदी:
१. कैद: जादूटोणा किंवा अघोरी प्रथा करण्यासाठी दोषी आढळल्यास 6 महिने ते 7 वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते.
२. दंड: दोषी व्यक्तीवर 5,000 रुपये किंवा त्याहून अधिक दंड आकारला जाऊ शकतो.
३. दोन्ही (कैद आणि दंड): परिस्थितीनुसार, न्यायालय दोषीला कैद आणि दंड या दोन्ही शिक्षांचा आदेश देऊ शकते.
सदर घटनेची माहिती पत्रकार व भिवंडी शहरात पसरताच आयुक्त दालनाकडे धाव घेतली व आयुक्तांच्या जादूटोणा प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.
भारत हे धर्म निरपेक्ष राष्ट्र आहे.शासकिय कार्यालयात कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करण्यास मनाई आहे, असा कायदा असतांना पालिकेचे आयुक्त यांनी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधानाची पायमल्ली केली आहे.या आयुक्तांवर तातडीने महाराष्ट्र जादुटोणा आणि अघोरी प्रथा विरोधी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी भिवंडी शहरातील नागरीक व व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघाच्या पत्रकारांनी केली आहे.
सदर प्रकाराबाबत पालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे की, पालिका आयुक्त सफाई कामगारांच्या बदली करण्यापासून ते पालिकेच्या सर्व विकास कामांवर पहिले पैसे आणि नंतर काम असा एक कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयुक्त अजय वैद्य हे जीएसटी विभागात कार्यरत असतांना मंत्रालयात प्रतिनियुक्तीने गेले होते, मंत्र्यांच्या आशिर्वादाने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीने प्रशासक या पदावर आले. भिवंडी महानगरपालिका ही मलाई देणारी महापालिका आहे.आपल्या मलईदारपदावर अन्य कुणाची वर्णी लागु नये यासाठी आयुक्त कायम जादुटोणाचा वापर करतात.आयुक्तांच्या दालनात कायम साधुसंतांचा राबता असतो असे पालिका कर्मचाऱ्यांचा दबक्या आवाजात चर्चा आहे. महाराष्ट्र शासन आयुक्तांच्या या कृत्याचा जाब विचारणार की, पाठीशी घालणार असा प्रश्न भिवंडी शहरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.