Uncategorized
Trending

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जातीयवादी मानसिकता थांबणार तरी कधी? लाखो भिम अनुयायांचा संतप्त सवाल.


कल्याण- विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती महोत्सव काल १४ एप्रिल रोजी संपूर्ण जगात साजरा झाला. या महोत्सवाची वाट सुजाण नागरिक व भिम अनुयायी वर्षभर पाहात असतात. हा महोत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासन पुढाकार घेऊन चोख व्यवस्था करीत असते मात्र या घटनेला अपवाद ठरली ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रशासन! मिरवणूक दरम्यान पालिकेने रस्ता लगत व डिवायडर मध्ये लावलेली झाडांच्या बेसुमार वाढलेल्या फांद्या न छाटल्यामुळे मिरवणुकीच्या वाहनावरील देखाव्यांना अडचणी निर्माण होत असल्याने महापालिकेने जातीयवादी माणसिकता ठेवून झाडांच्या फांद्या व शहरात स्वच्छता न ठेवल्याचा आरोप करीत लाखों भिम अनुयायांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा धिक्कार करीत संताप व्यक्त केला आहे.


१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण कल्याण शहरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. शहराच्या विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्वाच्या घटनांवरील मोठमोठे देखावे शहराच्या विविध भागात उभारण्यात आले होते.हे देखावे पाहण्यासाठी लाखो भिम अनुयायी रस्तावर उतरले होते, भर उन्हाच्या तडाख्यात हे देखावे पाहण्यासाठी भिम अनुयायी आपल्या लहान लेकरांना घेवून रस्तावर फिरत होते परंतु पालिकेने कुठेही पाणी पिण्याची व्यवस्था केली नाही.कुठेही वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली नाही. पालिकेने रस्ता स्वछ करणे आवश्यक असतांना शहराच्या बहुतांशी भागात घाणीचे साम्राज्य निदर्शनास येत होते. विशेष म्हणजे संध्याकाळी शहारात वाहानांवर विविध ऐतासिक देखावे साकारलेले असतांना या देखाव्यांना रस्ता लगत असणा-या झाडांच्या बेसुमार वाढलेल्या फांद्याचा अडथळा निर्माण होत होता. या संदर्भात प्रभाग ‘ड’ विभागातील वाहनावर देखावा साकारून मिरवणूकीत सहभागी झालेले डॉ. सुनील भालेराव यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, आम्ही ट्रकवर मनुस्मृती दहनाचा ऐतिहासिक घटनेचा देखावा साकारला होता. रक्ताच्या दुतर्फा वाढलेल्या फांद्यामुळे हा देखावा घेऊन मार्गक्रमण करत असतांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक गैरसोयींमुळे भिम अनुयायी त्रस्त झाला होता.मिरवणूक सुरू असतांना कल्याण पुर्व भागात काही तास लाईटच गेल्याने नागरिकांना मिरवणुकीत लावलेले जनरेटरच्या लाईटचा आधार घ्यावा लागत असल्याने, मिरवणूकीत सहभागी अनुयायी भीतीच्या सावटाखाली वावरत होता असे डाॅ. सुनील भालेराव यांनी सांगून मिरवणूक दरम्यान गेलेली लाईट या बाबतीत वीज महावितण कंपनीची चौकशी करण्यात यावी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरात स्वच्छता व मार्गक्रमस्त झाडांच्या बेसुमार वाढलेल्या फांद्या का छाटल्या नाहीत याची चौकशी करून महापालिकेच्या जातीयवादी माणसिकतेची चौकशी करून बेजबाबदार प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर शहरात प्रत्येकवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते असे कल्याण शहर जयंती उत्सव मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष घनश्याम गायकवाड यांनी सांगितले. कल्याण शहर जयंती महोत्सवाचे अध्यक्ष आधार सुरदास यांनी माहिती देतांना सांगितले की, भिम अनुयायी लाखोंच्या संख्येने मिरवणूकीत रस्तावर उतरतो, महापालिकेने सुविधापुरवणे आवश्यक आहे. पण तसे होत नाही. कल्याण शहरात जयंती महोत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी शहर जयंती महोत्सवाचे कार्यकर्ते विश्वस्त कार्याध्यक्ष राज बाळदकर, विश्वस्त सचिव रमेश बर्वे, निमंत्रक राजा सावंत, अक्षय गायकवाड, किरण गायकवाड, विकी साळवे, सुनिल बिद्रे, अतिष साळवे, रोहित खरे, शक्ति धनगर, आकाश सोनावणे, किरण धनगर, अदि कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव पार पाडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button